मौजे जैनपूर हे गाव महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरी नदीच्या पावन कुशीत वसलेले आहे. हे गाव नेवासा तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात असून नेवासा–श्रीरामपूर रोडवरील बेलपिंपळगाव फाट्यापासून सुमारे ७ किलोमीटर उत्तरेस आहे. गोदावरी नदीच्या तीरावर व निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे गाव धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले आहे.
जैनपूर या गावाला हे नाव कसे पडले, याबाबत एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते. रामायण काळात प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण हे चौदा वर्षांच्या वनवासादरम्यान पंचवटी, नाशिक येथे वास्तव्य करत होते. त्या काळात मारीच नावाच्या राक्षसाने कांचन मृगाचे रूप धारण करून सीतेला मोहात पाडले. सीतेच्या आग्रहामुळे प्रभू श्रीराम त्या हरिणाच्या मागे निघाले. हरिण पुढे पुढे जात राहिले व प्रभू श्रीराम त्याच्या मागे चालत राहिले.
गोदावरी नदीच्या काठाने चालताना प्रभू श्रीरामांना एक उंच टेकडी दिसली. त्या टेकडीवरून त्यांनी धनुष्याला बाण लावून त्या हरिणावर बाण सोडला. तो हरिण प्रत्यक्षात मारीच राक्षस होता आणि बाण लागल्यानंतर तो जोरात ओरडू लागला. ज्या ठिकाणी त्याचे शरीर पडले, त्या जागेला पुढे 'कायगाव' असे नाव पडले. तसेच ज्या टेकडीवरून प्रभू श्रीरामांनी विजय मिळवला, त्या ऐतिहासिक विजयामुळे त्या परिसराला पुढे 'जैनपूर' हे नाव प्राप्त झाले.
पुढे लक्ष्मण त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी प्रभू श्रीरामांना शिवलिंगाची स्थापना करताना पाहिले. त्या देवस्थानास प्रभू श्रीरामांनी 'संकटेश्वर महादेव' असे नाव दिले. आज हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून प्रत्येक सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे ठिकाण आज 'नेवरगाव' या नावाने ओळखले जाते.
इतिहासानुसार जैनपूर गावातील मूळ कुटुंबे अजमेर (राजस्थान) येथून गाई चारत चारत महाराष्ट्रात आली व गोदावरी नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाली. उंच टेकड्यांमुळे महापुरापासून व जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळाले. पाणी व चाऱ्याची मुबलकता असल्याने लोक येथे स्थायिक झाले. पुढे शेती व पशुपालन हा मुख्य व्यवसाय बनला आणि लोकसंख्या वाढत गेली. रामायण काळापासून आजपर्यंत जैनपूर गावाला प्राचीन परंपरेचा वारसा लाभलेला आहे.
जैनपूर गावाच्या पूर्वेस मौजे बेलपांढरी, दक्षिणेस मौजे बेलपिंपळगाव, पश्चिमेस मौजे घोगरगाव असून उत्तरेस पवित्र गोदावरी नदी वाहत आहे.
मौजे जैनपूर नवे येथील श्री दक्षिणमुखी हनुमान देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून ते गावाचे आराध्य दैवत आहे. प्रत्येक शनिवारी या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. श्रावण महिन्यात गावातील तरुण गोदावरी नदीपात्रातून पाणी आणून श्री हनुमानास अभिषेक घालतात.
श्री राम नवमी ते हनुमान जयंती या पर्वकाळात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ हनुमान चालीसा, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भावार्थ रामायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
या सप्ताह काळात परिसरातील संत, महंत, कीर्तनकार व प्रवचनकार मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हे देवस्थान धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे केंद्र आहे.
लांबी १४५० कि.मी असून, गोदावरीचे उगम स्थान त्रिंबकेश्वर आहे. गोदावरी नदी आग्नेय दिशेला वाहत जाऊन भारतातील प्रमुख नद्यांमध्ये गणली जाते. या नदीला 'दक्षिण गंगा' असेही म्हटले जाते. गोदावरीचे राज महेंद्री जवळ बंगालच्या उपसागरात मिळते. या नदीचे अनेक उपनदी आहेत – इंद्रावती, मंजिरा, दारणा, प्रवरा, शिवना, मांजरा, वैनगंगा.
मौजे जैनपूर गावातून गोदावरी नदी वाहत असल्यामुळे गाव पूर्णतः बागायत झालेले आहे. जैनपूरला ३ कि.मी. लांबीचा नदी किनारा लाभलेला आहे. मुख्य व्यवसाय शेती असून पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, गौ पालन व मासेमारी केले जाते. गोदावरीच्या पाण्यामुळे गाव सुजलाम व सुफलाम झालेले आहे.
शेतकरी मुख्य पिके – ऊस, कपाशी, मका, कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी. गावातील कहार व भिल्ल समाज मासेमारी करून आपली उपजीविका साधतात. जैनपूरची जमीन सुपीक असून काळी, पोयटा, खळगट प्रकारची आहे. नदीत पाणी आल्यावर लोक पूजाअर्चा करतात व फळांचा नैवद्य अर्पण करतात.
मौजे जैनपूर येथील बहुतांश शेतकरी गोदावरी नदीच्या पाण्यावर शेती करतात. गोदावरी नदी पात्र इलेक्ट्रिक मोटारच्या साह्याने पाणी उपसा केला जातो. गावातील शेती ऊस, फळबाग, कांदा, कपाशी, सोयाबीन, मका, घास इ. प्रकारची पिके घेतली जातात. गावात एकूण विहिरींची संख्या ८० आणि बोरवेल ५० आहेत.
ठिबक सिंचन: ठिबक सिंचनचा वापर करून अनेक शेतकरी आज आपली शेती पिके घेत आहेत. या सुविधेचा वापर करून शेतकरी फळबाग, कपाशी, मका इ. पिके घेतात. गावातील ८० शेतकरी या सुविधेचा लाभ घेतात आणि शासनाकडून ८०% अनुदान उपलब्ध आहे.
तुषार सिंचन: या सुविधेचा वापर करून अनेक शेतकरी सुखी झालेले आहेत. या सुविधेमुळे कमी पाणी लागते आणि शासनाकडून ८०% अनुदान DBT प्रणालीद्वारे खात्यात मिळते.
प्रवाही सिंचन: या सुविधेचा वापर अनेक शेतकरी पूर्वीपासून करतात. जे शेतकरी ठिबक किंवा तुषार सिंचन सुविधेचा वापर करत नाहीत, ते प्रवाही सिंचन वापरतात.
इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत. भव्य क्रीडा मैदान, स्वतंत्र शौचालय सुविधा, ४७ विद्यार्थी, उत्कृष्ट पोषण आहार आणि शैक्षणिक कामगिरी.
इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत. भव्य क्रीडा मैदान, स्वतंत्र शौचालय सुविधा, ७८ विद्यार्थी, डिजिटल शिक्षण, गायन, वाचन, नृत्य यावर लक्ष.
जैनपूर नवे व जुने अंगणवाडी: मुलांना उत्तम आहार व शिक्षण, वयोगटानुसार संख्या, गर्भवती मातांचे पालन, किशोरवयीन मुलांचे प्रशिक्षण.
