स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची प्रमुख स्वच्छता योजना आहे, जी गावात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ पाणी/स्वच्छ परिसर सुनिश्चित करण्यासाठी राबविली जाते.
या योजनेचे मुख्य उद्दिष्टे
-
गावात शुद्ध आणि सुरक्षित वातावरण तयार करणे.
-
घरगुती व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती.
-
कचरा व्यवस्थापन आणि कचर्याची योग्य विल्हेवाट.
-
स्वच्छता शिक्षण व लोकजागृती.
ग्रामपंचायत स्तरावर काय केले जाते
-
सार्वजनिक ठिकाणी नियमित साफसफाई.
-
शौचालये तयार करुन, ती योग्यरित्या वापरण्याची सक्ती.
-
कचरा विभाजन व पुनर्वापरासाठी सूचना.
-
शाळांमध्ये व ग्रामसभा बैठकीत स्वच्छता संदेश.